२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महापालिकेच्या मुकादमाला अटक !

शोरमा या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या ४ गाड्या चालू ठेवण्यासाठी ३ सहस्र रुपयांची लाच मागून त्यातील २ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना प्रभाग क्रमांक ४ चे प्रभारी मुकादम संजय पेडामकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

पीएच्.डी. शिष्यवृत्तीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन नाही !

पीएच्.डी. शिष्यवृत्तीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या सेट विभागाने घोषित केला आहे. चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.

महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या ‘अ‍ॅप’चे अनावरण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या ‘अ‍ॅप’चे अनावरण करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी राबवण्यात येणार्‍या विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रम यांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोचवण्यात येणार आहे.

Maldives Threatened India : (म्हणे) ‘लहान असलो, तरी आमच्यावर दादागिरी करण्याचा तुम्हाला परवाना मिळत नाही !’ – मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू

‘चीनच्या समर्थनावरून मालदीवचा भारताला धमकी देण्याचा प्रकार म्हणजे आत्मघात होय’, हे भारताने कृतीतून त्याला दाखवून दिले पाहिजे. असे केल्याविना चीनला योग्य संदेश जाणार नाही !

पाकमधील महिला ब्रिटिश राजदूताने दिली पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिका आणि युरोपीय देश एकीकडे भारताशी गोडीगुलाबीने वागत असल्याचे दाखवतात आणि दुसरीकडे भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रयत्न करत असतात.

अमरावती येथील जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना जिवे मारण्याची धमकी !

हिंदूंच्या धर्मगुरूंना लक्ष्य करून हिंदूंना दिशाहीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. याविषयी सरकारने गांभीर्याने चौकशी करून संत-महंतांच्या रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक !

३ शंकराचार्यांकडून श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे समर्थन !

३ शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला समर्थन दिले आहे, तर केवळ ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांनी याला धर्मशास्त्राच्या आधारे विरोध केला आहे.

SFJ Referendum For Khalistan : अमेरिकेत खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ खलिस्तानसाठी सार्वमत घेणार !

भारतासाठी कॅनडा आणि अमेरिका आता एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांकडे भारताने ‘खलिस्तान समर्थक देश’ याच दृष्टीने पाहून त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे !

जगप्रसिद्ध गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन !

डॉ. अत्रे या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध गायिका होत्या. अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळाले आहेत.

Urdu Houses Maharashtra : महाराष्ट्रातील आणखी ११ शहरांमध्ये उर्दू घरांची निर्मिती होण्याची शक्यता !

मातृभाषा मराठीचे भाषाभवन आणि विद्यापीठ रखडले; मात्र ४ उर्दू घरांची निर्मिती, तर पाचव्या घरासाठी निधी संमत ! महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे कि उर्दू ? याविषयी विचार करायला लावणारे धोरण !