मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित बोपगांव (पुणे) येथे मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव येथे ३१ डिसेंबर या दिवशी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील बहुसंख्य मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

भारताची विश्वशक्तीकडे वाटचाल ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

अमेरिकेत सर्व भौतिक सुखे आहेत; मात्र तेथे संस्कार नाहीत. याउलट भारत असा देश आहे की, जिथे अद्यापही संस्कार टिकून आहेत. सध्या देशातील वातावरण पालटत असून भारत विश्वशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

सातारा येथील सनातनची साधिका कु. राधा कोल्हापुरे हिला आंतरशालेय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त !

ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच मी हे यश मिळवू शकले’, असे सांगत तिने यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजन यांना दिले आहे.

१ सहस्र ८२६ पानांचे पुरावे देऊनही मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ‘ईडी’कडून कारवाई नाही !

तक्रारदराने ईडी कार्यालयासमोरच कापला केक !

म्हैस आणि रेडे यांच्या चरबीपासून सिद्ध केलेले बनावट तूप जप्त !

भिवंडी येथे बंद केलेल्या पशूवधगृहातील प्रकार उघड !

मलंगगडमुक्तीच्या भावना पूर्ण केल्याविना स्वस्थ बसणार नाही !- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मलंगगडाच्या संदर्भातील तुमच्या सर्वांच्या भावना मला माहिती आहेत. या मलंगगडावर येऊन शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन चालू केले.

शाळा बसचालकांनी संपात सहभागी होऊ नये; अन्यथा प्रसंगी कारवाई ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

संपामुळे अनेक पंपांवर इंधन उपलब्ध होत नसल्याने शाळा बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे शाळा बसचालकांनी सांगितले.

वसईतील अयप्पा मंदिर सभागृहात ६ ते ८ जानेवारी या कालावधीत हिंदु महासंमेलन !

८ जानेवारी या दिवशी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमात उपस्थित रहाणार असून या वेळी हिंदु जागरण मंचच्या प्रांत कार्यकर्त्या प्रीती राऊत या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

कनिष्ठ अधिकारी नोंदी करत नाहीत ! – जरांगे यांचा आरोप

मराठवाड्यातील प्रत्येक गावाचे रेकॉर्ड पडताळले जातील. मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू आहे. पुरावे न देणार्‍या अधिकार्‍यांची नावे द्या, असे मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सांगून आश्वस्त केले.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अनागोंदी कारभाराची कार्यकारी अधिकार्‍यांकडून स्वीकृती !

प्रसादासाठी करण्यात आलेल्या लाडवांमध्ये गुणवत्ता राखली गेली नसल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत मान्य केले.