मुंबई आणि जुहू विमानतळ ३ दिवस १ घंटा बंद !

भारतीय हवाई दलाच्या वतीने मरिन ड्राईव्ह येथे १२ ते १४ जानेवारी या कालावधीत हवाई प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे.

पालघर येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची सुटका !

पालघर येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची सुटका पोलिसांनी ४ किलोमीटरपर्यंत गोतस्करांचा पाठलाग करत त्यांना पकडले. गाडीत ६ गोवंशियांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले आहे.

कामाच्या वेळी उत्साह ठेवून कामाचा आनंद घ्या ! – सुधा मूर्ती, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका

मी आजही आठवड्याला ७० घंटे काम करते. कामाच्या वेळी उत्साह ठेवला, तर सुटीवर असल्याप्रमाणेच वाटते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी केले.

आजपासून कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे प्रयोग !

कोल्हापूर शहरातील महात्मा गांधी मैदानावर १३ ते १५ जानेवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे विनामूल्य प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.

मुंबई येथे ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम जीवनचरित्र स्पर्धे’चे व्यापक आयोजन ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

अयोध्या येथे होणार्‍या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम जीवनचरित्र स्पर्धा’ होणार आहे.

श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते ! – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत होते.”

KalaRam Darsan PM MODI : नाशिक येथील काळाराम मंदिरातील प्रभु श्रीरामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन !

श्री काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत आणि विश्‍वस्त यांच्या वतीने मोदी यांचा प्रभु श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सांगलीच्या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन !

महाराष्ट्रातील सर्व कारागृहांत ६ जानेवारीपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी’ साजरी होत आहे. त्या अंतर्गत सांगली येथील कारागृहात ८ जानेवारी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात आले.

27th National Youth Festival : घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाची हानी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तरुण राजकारणात आले, तर घराणेशाहीचे राजकारण अल्प होत जाईल.राजकीय माध्यमातूनही देशाची सेवा करता येईल.

सांगली येथे १ सहस्र २०० कडव्या-लढवय्या शीख तरुणांचा हिंदु एकता आंदोलन संघटनेमध्ये प्रवेश !

या वेळी शीख बांधवांनी असा निर्धार व्यक्त केला की, हिंदुत्वाची सर्व शक्ती एकवटून आम्ही लवकरच प्रभाग क्रमांक ९ मध्ये हिंदु एकता आंदोलनाची पहिली शाखा काढणार आहोत.