२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महापालिकेच्या मुकादमाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

उल्हासनगर – शोरमा या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या ४ गाड्या चालू ठेवण्यासाठी ३ सहस्र रुपयांची लाच मागून त्यातील २ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना प्रभाग क्रमांक ४ चे प्रभारी मुकादम संजय पेडामकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. (अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! – संपादक) त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्यांसाठी लाच मागितली जाते.