Maldives Threatened India : (म्हणे) ‘लहान असलो, तरी आमच्यावर दादागिरी करण्याचा तुम्हाला परवाना मिळत नाही !’ – मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू

चीनच्या दौर्‍यावरून परतल्यावर मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांनी नाव न घेतला भारताला धमकावले !

मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू (मध्यभागी)

माले (मालदीव) : आम्ही आकाराने लहान असू; पण त्यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही. मालदीव ही कोणत्याही देशाची संपत्ती नाही, अशा शब्दांत मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी चीनच्या ५ दिवसांच्या दौर्‍यावरून परतल्यावर भारताचे नाव न घेता त्याला धमकी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत आणि मालदीव यांच्यामध्ये वाद चालू असतांना राष्ट्रपती मुइज्जू चीनला गेले होते. त्यांच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. भारताच्या निषेधानंतर या मंत्र्यांना निलंबित करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

‘चीनच्या समर्थनावरून मालदीवचा भारताला धमकी देण्याचा प्रकार म्हणजे आत्मघात होय’, हे भारताने कृतीतून त्याला दाखवून दिले पाहिजे. असे केल्याविना चीनला योग्य संदेश जाणार नाही !