अमरावती येथील जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना जिवे मारण्याची धमकी !

महाराजांना पोलीस संरक्षण देण्याची अनुयायांची मागणी

जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज

अमरावती – अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे येथील रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यानंतर त्यांना एका पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी महाराजांच्या अनुयायांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘आप जो अयोध्या, अयोध्या कर रहे हो, वह आपको महंगा पडेगा । आज नही तो कल, कुछ दिनो मे आपका अंत निश्‍चित है ।’ असे त्या पत्रात म्हटले आहे. ते पत्र कुणी पाठवले, याचा उल्लेख पत्रात नाही. ‘या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराजांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळावे’, अशा मागणीचे निवेदन विदर्भपीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटना यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धर्मगुरूंना लक्ष्य करून हिंदूंना दिशाहीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. याविषयी सरकारने गांभीर्याने चौकशी करून संत-महंतांच्या रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक !