महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या ‘अ‍ॅप’चे अनावरण !

  • सरकारी योजना, घोषणा आणि उपक्रम यांची माहिती ‘ॲप’द्वारे पोचवणार !

  • राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला प्रारंभ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीपासून राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीपासून राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या ‘अ‍ॅप’चे अनावरण करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी राबवण्यात येणार्‍या विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रम यांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोचवण्यात येणार आहे. ‘या अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्या योजना लागू होतील, याची माहिती गरजू महिलांपर्यंत पोचवली जाईल’, असे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.