पिंपरी येथील नाट्यसंमेलनासाठी २० लाखांचा निधी देणार ! – अजित पवार

पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

हलाल अर्थव्यवस्था भारताला खिळखिळी करत आहे ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेशी समांतर होत आहे. हलाल अर्थव्यवस्थेतून जमलेल्या पैशांतून देशविरोधी कारवायांना साहाय्य केले जात असल्याचे उघड झाले आहे.

मंचर (पुणे) येथे अयोध्येच्या श्रीराम मंगल अक्षतांची ग्राम प्रदक्षिणा यात्रा !

मंचर (तालुका आंबेगाव) येथे अयोध्या श्रीराम मंदिर सोहळ्याप्रीत्यर्थ श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्येच्या वतीने आलेल्या श्रीराम मंगल अक्षतांची भव्य अशी ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. प्रदक्षिणा सोहळ्याचा प्रारंभ श्रीराम मंदिर, मंचर या ठिकाणाहून भव्य अशा आरतीने झाला.

प्रभु श्रीराम कलशाचे पनवेल येथील सनातन आश्रमाजवळील शिवमंदिरात पूजन !

प्रभु श्रीराम कलशाचे सनातनच्या देवद आश्रमाजवळील शिवमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता आगमन झाले. कलशाचे पूजन ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे श्री. अविनाश गिरकर यांनी केले. त्यानंतर कलश शिवमंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

राजकारणी आणि खरे संत यांच्याकडे पहाण्याचा जनतेचा दृष्टीकोन !

‘राजकारण्यांना त्यांचे पद गेल्यावर कुणाला त्यांचे नावही आठवत नाही. याउलट खर्‍या संतांकडून जनतेला काहीही नको असते. उलट लोक खर्‍या संतांना काहीतरी अर्पण करतात, संतांनी सांगितलेली साधना करतात आणि साधनेत पुढे जातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Minorities Apeasement : (म्हणे) ‘भारतातील अल्पसंख्यांकांवर पाकमधील अल्पसंख्यांकांसारखी स्थिती उद्भवेल !’ – माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो

रिबेरो यांना पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची भयावह स्थिती ठाऊक असतांना ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत, हे आश्‍चर्यकारकच !

Threat To Journalist : कणकवली (सिंधुदुर्ग) उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर यांनी कारवाईच्या भीतीने दिले त्यागपत्र !

डॉ. आचरेकर यांच्याविषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या पार्श्‍वभूमीवर कारवाई होण्याच्या भीतीने डॉ. आचरेकर यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्याचे समजते.

Water Issue Goa : तिलारी धरणातून गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठ्याला प्रारंभ

तांत्रिक गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणातून पाणी सोडण्यास येणारी अडचण दूर होऊन आज, २७ डिसेंबरला धरणातून गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठ्यास प्रारंभ झाला.

Sand Mafia Goa : होड्यांवर कारवाई करण्याची अधिकार्‍यांची चेतावणी; पण प्रत्यक्षात अधिकारी फिरकलेच नाहीत !

‘पोलीस संरक्षणात उर्वरित २५ होड्या तोडणार’, असे या खात्याच्या अधिकार्‍यांनी घोषित केले होते; त्यामुळे ‘एकाच होडीवर का कारवाई केली ?’, असा प्रश्‍न उपस्थित झाला.

CAG Report : आडाळी (सिंधुदुर्ग) औद्योगिक क्षेत्राचे ७/१२ वरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष नोंदी यात मोठी तफावत !

अहवालात ‘कॅग’ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक निधीची (तिजोरीची) हानी झाली आहे.