सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘राजकारण्यांना जोपर्यंत एखाद्या पक्षात एखादे पद असते किंवा मंत्रीपदासारखे सरकारी पद असते, तोपर्यंत जनता त्यांना महत्त्व देते; कारण त्यांच्याकडून जनतेला काहीतरी हवे असते. त्यांचे पद गेल्यावर कुणाला त्यांचे नावही आठवत नाही. याउलट खर्या संतांकडून जनतेला काहीही नको असते. उलट लोक खर्या संतांना काहीतरी अर्पण करतात, संतांनी सांगितलेली साधना करतात आणि साधनेत पुढे जातात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले