China Activity : हिंद महासागरातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारताचे लक्ष !

हिंद महासागरात एक स्थानिक नौदल शक्तीच्या रूपात आम्ही ‘तेथे काय चालू आहे ?’, यावर लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर्. हरि कुमार यांनी केले.

शेतीसाठी पाणीउपसा करणार्‍या पाच लघु पाटबंधारे तलावांवर उपसाबंदी !

उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र धारकाचा उपसा अनुज्ञप्ती (परवाना) १ वर्षाच्या कालावधीसाठी रहित करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.

सातारा जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्तीनंतर कंत्राटी कर्मचार्‍यांचे उपोषण मागे !

जिल्हाधिकारी डुडी यांनी स्वत: या उपोषणाची नोंद घेत सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना भ्रमणभाष केला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘साधना शिबिरा’ला उत्साहात प्रारंभ !

जिज्ञासूंना अध्यात्मातील विविध तत्त्वांची ओळख करून देणे, तसेच काळानुसार योग्य साधनेविषयी मार्गदर्शन करणे, या उद्देशांनी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

देहली येथील सुगम गायिका श्रीमती सुमन देवगण यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट !

‘आजच्या काळासाठी आवश्यक असेच कार्य गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) करत आहेत. याची आजच्या पिढीसाठी पुष्कळ आवश्यकता आहे’, असे मनोगत व्यक्त केले.

UNESCO Pakistan : ‘युनेस्को’ने हिंदु मंदिरांच्या संरक्षणाचे काम पाक सरकारकडून काढून घेऊन स्वत:कडे घ्यावे ! – दारा शिकोह फाऊंडेशन

अलीगड येथील ‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

खोटे किंवा सूड उगवण्यासाठी बलात्कारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पीडितेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय

बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले.

शबरीमाला यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात खाद्यपदार्थ बनवणार्‍या माकपच्या धर्मांध नेत्याला रंगेहात पकडले !

धर्मांधांचा भरणा असलेला सत्ताधारी माकप हिंदूंच्या मुळावर उठला आहे, हेच खरे ! अशा पक्षावर बंदीच हवी !

युद्धविरामानंतर इस्रायल-हमास यांच्यात पुन्हा युद्ध चालू !

इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेला युद्धविराम १ डिसेंबर या दिवशी संपला. त्यानंतर या दोघांत पुन्हा युद्ध चालू झाले आहे. इस्रायलने दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात, तर हमासने इस्रायलमधील काही भागात क्षेपणास्त्र डागली.

रशियामध्ये ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी !

रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशात ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी घातली. रशियाच्या कायदा मंत्रालयाने बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने संमती दिली. न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी बंद दाराआड केली.