सातारा, १ डिसेंबर (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचार्यांनी गत ३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर उपोषण चालू केले. हे उपोषण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. जिल्हाधिकारी डुडी यांनी स्वत: या उपोषणाची नोंद घेत सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना भ्रमणभाष केला. या वेळी कंत्राटी कर्मचार्यांना पी.एफ्. बोनस, किमान वेतन कायद्यानुसार देण्याच्या सूचना केल्या, तसेच आरोग्य विषयक आवश्यक सुविधा देण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी डुडी यांनी केलेल्या आवाहनाला मान देत कंत्राटी कर्मचारी यांनी उपोषण स्थिगत केले. (त्यासाठी कर्मचार्यांना उपोषण का करावे लागते ? – संपादक)