China Activity : हिंद महासागरातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारताचे लक्ष !

भारतीय नौदल प्रमुखांची चीनला चेतावणी !

भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर्. हरि कुमार

नवी देहली – महासागरांकडे एक सामायिक वारसा म्हणून पाहिले जाते. महासागरांचा वापर कोणत्याही देशाच्या वैध आर्थिक आकांक्षांच्या पूर्ततेसाठी केला जातो. चीनची हिंद महासागरातील उपस्थिती, ही या दृष्टीकोनातून वैध असली, तरी हिंद महासागरात एक स्थानिक नौदल शक्तीच्या रूपात आम्ही ‘तेथे काय चालू आहे ?’, यावर लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर्. हरि कुमार यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.

एडमिरल कुमार पुढे म्हणाले की,

१. हिंद महासागरात आम्ही कुठल्याही देशाच्या हालचालींकडे लक्ष ठेवतो आणि हेसुद्धा पहाण्याचा प्रयत्न करतो की, चीन काय करत आहे ?

२. महासागरात उपस्थित असलेले देश कोणत्या कामात गुंतले आहेत ? आणि त्यांचे उद्देश काय आहेत ?, यांकडे आमची दृष्टी असते.

३. देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने जहाज, पाणबुडी, विमाने, तसेच मानवरहित विमाने तैनात केले आहेत.

४. नौदलाचे काम हे समुद्री क्षेत्रात भारताच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण आणि व्यापारात वृद्धी करणे, हे आहे.