अत्याचार करणार्या शेतमालकावर गुन्हा नोंद !
चाळीसगाव (जळगाव) – शेतात कामाला आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर ५० वर्षीय शेतमालकाने वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी शेतमालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशा वासनांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !
डोक्यात सळई पडून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे – शाळेतून परत जाणार्या मुलाच्या डोक्यात सळई पडली. त्यामुळे ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बांधकाम व्यावसायिकाने मुख्य रस्त्यावर सुरक्षेसंदर्भातील कोणतीही उपाययोजना केली नव्हती.
घायाळ प्रवाशाला सोडून ‘उबर’ चालकाचे पलायन !
पुणे – ‘उबर’ टॅक्सीने मुंबईकडे येतांना ती ट्रकला धडकली. या अपघातात प्रवाशाला प्रचंड वेदना होत असूनही त्याला तिथेच सोडून टॅक्सीचा चालक पळून गेला. अशा आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग पोलीस, परिवहन अधिकारी आणि उबर आस्थापन यांनी साहाय्य केले नसल्याचा आरोप प्रवाशाने केला आहे.
असंवेदनशील समाज !
हिंदी चित्रपट अभिनेते हिंदीत बोलण्यास कचरतात ! – राज्यपाल
मुंबई – राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत आणि वाणिज्यदूत भेटायला येतात. काहींना हिंदी भाषा अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापिठांमध्ये हिंदी भाषा विभाग कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांविषयी उदासीन आहोत. हिंदी चित्रपट अभिनेते, अभिनेत्री इंग्रजीतच बोलतात. हिंदीत बोलण्यास कचरतात, हे दुर्दैवी आहे, असे विधान राज्यपाल रमेश बैस यांनी केले. गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. या वेळी ते बोलत होते.
हिंदी अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यात मातृभाषेचा अभिमान नसणे खेदजनक !
अंनिसच्या विरोधात अजय छाजेड यांची आंदोलनाची चेतावणी !
पुणे – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर धाम सरकार यांच्या येरवडा येथे संगमवाडी भागात आयोजित केलेल्या सत्संगाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध दर्शवला होता. त्याला विरोध म्हणून, तसेच पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अतुल छाजेड आंदोलन करणार असून देशद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.