मुंबई – विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापिठास ‘वर्ग १’ विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक ‘नॅक’कडून (NACC) ‘अ++’ श्रेणी आणि ३.६५ ‘सी.जी.पीए.’ गुणांकन असलेल्या मुंबई विद्यापिठास ‘वर्ग १’ ग्रेडेड ऑटोनॉमीचा (स्वायत) दर्जा देण्यात आला आहे. यामुळे विद्यापिठात विविध शैक्षणिक संधी उपलब्ध होतील. आवश्यकतेनुसार स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आवश्यकता ओळखून नाविन्यतेच्या क्षेत्रात पदवी अन् पदविका अभ्यासक्रमही विद्यापिठास चालू करता येतील.