जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली असून ते हवेत गोळीबार करत आहेत ! – मायकेल रुबिन, अमेरिकेचे माजी अधिकारी

मला वाटते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी अशा पद्धतीने भारतावर आरोप केले आहेत, ज्याचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत.

कॅनडामध्ये भारतियांमुळे अर्थव्यवस्थेला मिळतात ३ लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे !

खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात वाद निर्माण झाला आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचे सध्या थांबवले आहे. या निर्णयामुळे कॅनडातील अर्थतज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

निज्जर याच्या हत्येचे पुरावे काही आठवड्यांपूर्वी भारताला दिले !

काय पुरावे दिले, हे ट्रुडो जगजाहीर का करत नाहीत ?

पाकिस्तानमध्ये शिखांना ठार मारण्याची धर्मांध मुसलमानांची धमकी !

खलिस्तानची मागणी करणारे याविषयी तोंड उघडतील का ? कॅनडातून हिंदूंना हाकलण्याची धमकी देणारे खलिस्तानी पाकच्या विरोधात का बोलत नाहीत ?

इस्लामी देश इंडोनेशियामध्ये डुकराचे मांस असलेला पदार्थ खाणार्‍या हिंदु महिलेला २ वर्षांचा कारावास !

हिंदूबहुल भारतात गोमांस खाणार्‍यांना अशी शिक्षा कधी होणार ?

आंतरराष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेच्या प्रसारणाच्या वेळी दाखवण्यात आले भारताचे चुकीचे मानचित्र !

ग्रेटर नोएडा येथील ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेचे थेट प्रसारण करतांना भारताचे चुकीचे मानचित्र दाखवण्यात आले. यात जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवण्यात आला नाही.

गोव्यात ६०० बसगाड्यांचा तुटवडा असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण

राज्यातील अनेक भागांत अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोचलेली नाही. स्थानिक आमदार वारंवार गावामध्ये बसगाड्या चालू करण्याची मागणी करत आहेत; मात्र बसगाड्यांच्या कमतरतेमुळे ही मागणी पूर्ण झालेली नाही.

अथर्वशीर्षाचे पठण करा, सर्व संकटे दूर होतील ! : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे गोमंतकियांना आवाहन

अथर्वशीर्षाचे पठण केल्यास नकारात्मक शक्ती लोप पावून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दूर्वा वाहून एक सहस्र आवर्तने केल्यास त्याचे फळ प्राप्त होते. ‘संकटनाशक स्त्रोत्राचे पठण केल्यास मनुष्यावरील संकट दूर होते’, असे पुराणात गणकऋषि यांनी अथर्वशीर्ष लिहितांना स्पष्ट केले आहे.

महिलांना परदेशांमध्‍ये पाठवून फसवणूक करणार्‍या धर्मांधास अटक !

अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्‍याची शिक्षा का दिली जाऊ नये ? असा विचार कुणाच्‍या मनात आल्‍यास चूक ते काय ?

गोव्यात आजपासून जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

राज्यात चालू हंगामात आतापर्यंत एकूण ११८ इंच पाऊस पडला असून पावसाने सरासरी लक्ष्य पार केले आहे. आता पडणारा पाऊस अतिरिक्त असेल ! ऐन गणेशचतुर्थीच्या काळात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने लोकांना मूर्ती विसर्जनात अडथळा निर्माण होत आहे.