बाली (इंडोनेशिया) – येथे लिना मुखर्जी या ३३ वर्षीय महिलेने डुकराचे मांस असलेला पदार्थ खाऊन त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यामुळे तिला २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हा पदार्थ खाण्यापूर्वी तिने इस्लामी प्रार्थना केली होती. सुमात्रा बेटावरील पालेमबांग जिल्हा न्यायालयात तिच्यावर खटला चालवण्यात आला. महिलेला ठराविक धर्म आणि विशिष्ट गट यांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने माहिती पसरवल्यावरून दोषी ठरवण्यात आले. तिला कारावासासह दंडही ठोठावण्यात आला आहे. जर दंड भरला नाही, तर आणखी ३ मास तिला कारागृहात शिक्षा भोगावी लागणार आहे. या शिक्षेविषयी लिना मुखर्जी म्हणाल्या की, मला ठाऊक आहे की, मी चुकीचे केले आहे; पण इतकी कठोर शिक्षा दिली जाईल, याची मला अपेक्षा नव्हती.
Indonesian TikToker Gets 2 Years in Prison For Eating Pork After Reciting Islamic Phrase On Video in Balihttps://t.co/nWcMtyzuiJ
— TIMES NOW (@TimesNow) September 22, 2023
इंडोनेशियामधील मुसलमानांमध्ये डुकराचे मांस खाणे निषिद्ध असले, तरी देशातील चिनी वंशाचे लोक आणि बाली या हिंदूबहुल बेटावर रहाणारे मुसलमानेतर लोक डुकराचे मांस खातात.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल भारतात गोमांस खाणार्यांना अशी शिक्षा कधी होणार ? |