देशात ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ गाड्यांना प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्यांमध्ये धावणार आहेत.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी मंदिराची तोडफोड करत देवतांच्या मूर्तींना लाथ मारली !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांनाही धर्मांधांची हिंदुद्वेषी वळवळ अद्याप थांबलेली नाही. यासाठी सरकारने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !

पसार १९ खलिस्तानी आतंकवाद्यांची संपत्ती होणार जप्त !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याची संपत्ती जप्त केल्यानंतर अन्य पसार खलिस्तानी आतंकवाद्यांची सूची बनवली आहे. यात १९ आतंकवाद्यांचा समावेश आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मशिदीत असणार्‍या मदरशात मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अरब देशांत ज्या प्रमाणे गुन्हेगाराला शरीयतनुसार भरचौकात बांधून दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्यात येते, त्या प्रमाणे अशा वासनांधांना शिक्षा द्यावी, अशी मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

‘हलालमुक्त गणेशोत्सवा’चे प्रबोधनपर २० फलक चिपळूण पोलिसांनी काढले !

भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यघटना यांच्याशी विसंगत, तसेच देशविरोधी असणार्‍या आणि बहुसंख्यांकांवर अन्याय करणार्‍या हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृती करण्याऐवजी त्याविषयी जागृती करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हा नोंदवण्याची भाषा करणारे चिपळूण पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?

डेल्टा कॉर्पोरेशनला जीएसटी विभागाकडून ११ सहस्र कोटींची नोटीस

या आस्थापनाला ११ सहस्र १३९ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावली असून ५ सहस्र ६८२ कोटी रुपयांची दुसरी नोटीस या आस्थापनातील कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा या सलग्न आस्थापनांना बजावण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात वर्ष २०२२-२३ मध्ये १३ सहस्र ६५३ नवजात बालकांचा मृत्यू !

प्रत्येक दिवसाला ३१ बालकांचा, तर प्रत्येक ३९ व्या मिनिटाला एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.

नाशिक येथे रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार, गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची लूटमार !

बाजारात रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी रफिक हा गरजू प्रवाशांना हेरून त्यांची फसवणूक करत होता.

परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता मूर्तीदान करण्याचे आळंदी नगर परिषदेचे धर्मद्रोही आवाहन !

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. गणेशभक्तांनीच दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे काय होते ? याचे वास्तव जाणून धर्मभावना दुखावणार्‍या आळंदी नगर परिषदेला जाब विचारला पाहिजे.