पणजी, २३ सप्टेंबर (वार्ता.) – कॅसिनोच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणार्या डेल्टा कॉर्पोरेशनला बेंगळुरू येथील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आयुक्तांनी ११ सहस्र १३९ कोटी रुपये जीएसटी थकबाकी असल्याची नोटीस बजावली आहे. या आस्थापनाची एकूण कर थकबाकी १६ सहस्र ८२२ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आस्थापनाला ११ सहस्र १३९ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावली असून ५ सहस्र ६८२ कोटी रुपयांची दुसरी नोटीस या आस्थापनातील कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा या सलग्न आस्थापनांना बजावण्यात आल्या आहेत. या आस्थापनाचा मांडवी भूमीवरील (ऑफशोर) कॅसिनोही आहे. जुलै २०१७ ते मार्च २०२२ पर्यंतची वस्तू आणि सेवा कर थकबाकीची ही रक्कम आहे. या आस्थापनाने ही रक्कम न फेडल्यास आस्थापनाला कारणे दाखवा नोटीस जारी केली जाईल. आस्थापनाने तिच्या वार्षिक अहवालामध्ये याविषयीची स्वीकृती दिली आहे; परंतु डेल्टा कॉर्पोरेशनने वस्तू आणि सेवा कर संचालनालयाने बजावलेली नोटीस मनमानी स्वरूपाची आहे, असे म्हटले आहे. लागू करण्यात आलेला कर आणि बजावण्यात आलेली नोटीस अनधिकृत आहेत, तसेच या नोटिसीच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देता येईल, असे या आस्थापनाचे म्हणणे आहे.
#IncomeTaxNotice: Delta Corp को ₹11,139 करोड़ का टैक्स नोटिस, कंपनी पर कम GST भुगतान करने का आरोप@IncomeTaxIndia @DeltaCorpLtd #deltacorp #GST #taxes #busiessnews #incometax #casino #latestnews #moneycontrolhttps://t.co/hW1S637SSo
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) September 22, 2023
आस्थापनावरील नोटिसीचा समभाग बाजारावर परिणामडेल्टा कॉर्पोरेशन आस्थापनाला नोटीस दिल्यानंतर त्याचा परिणाम समभाग बाजारावर झाला. ‘मुंबई शेअर एक्सचेंज’च्या नोंदीनुसार डेल्टा कॉर्पचे समभाग ०.०२९ टक्क्यांनी घसरून १७५.२५ रुपयांवर बंद झाले. या आस्थापनाचे समभाग विकण्यासाठी एकच झुंबड उडाली. |
(सौजन्य : ET Now Swadesh)