नागपूर येथे ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप !

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागांतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. बसस्थानकामधील बस पाण्यात बुडल्या. 

मंत्रीमंडळाने ११ सहस्र ५०० कोटी रुपये संमत करताच जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची मोठी मेजवानी !

यावरून ‘अधिकार्‍यांना पैसे खायला मिळण्याच्या आनंदात त्यांनी ही मेजवानी केली’, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ? सरकारने अशा अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांना घरी बसवावे, तरच इतरांवर वचक बसेल !

शहाड (जिल्हा ठाणे) परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन आस्थापनात स्फोट

उल्हासनगर येथील शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या आस्थापनात नायट्रोजन टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण हरवले आहेत.

पंजाब पोलिसांना हवा असलेला आरोपी दाबोली (गोवा) पोलीस ठाण्यातून पसार

या आरोपीने दाबोली येथील पोलीस कोठडीत असतांना स्वतःला बरे वाटत नाही, असे सांगून दोन वेळा स्वच्छतागृहात गेला. तिसर्‍या वेळी ‘स्वच्छतागृहात जातो’, असे सांगून त्याने तिथे असलेल्या १० फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले.

श्री गणेमूर्तीदान मोहिमेस तीव्र विरोध केल्याने भोर (पुणे) मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मूर्तींचे वहात्या पाण्यात १०० टक्के विसर्जन !

भोरचा आदर्श इतरही गावांनी घेऊन मूर्तीदान न करता श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच करून श्री गणेशाची कृपा संपादन करून घ्यावी !

सांगलीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशीच महापालिकेकडून शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत !

संस्थांच्या मूर्तींसह घरगुती श्री गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जन होते, हे ठाऊक असतांना महापालिकेच्या सांडपाणी विभागाने शेरीनाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांकडून संताप व्यक्त होत आहे.

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकारांचे नृत्य !

प्रबोधनासाठी देवतांचे मानवीकरण करण्यातून देवतांची विटंबना होते, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच लक्षात येत नाही !

भक्तीचे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले