नवी देहली – केंद्रशासन लवकरच गृहकर्जावर अनुदान देणारी ६० सहस्र कोटी रुपयांची योजना आणणार आहे. २० वर्षे मुदतीसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेत सरकारकडून दिले जाणारे अनुदान थेट लाभार्थीच्या खात्यात जाईल. योजनेला लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर संमतीसाठी मांडले जाईल. नव्या योजनेचा शहरी भागातील सुमारे २५ लाख लोकांना लाभ होईल.
Govt Considering Rs 600-Billion Subsidised Loans For Small Urban Housing Over 5 Years: Reporthttps://t.co/IMoUVAbYKj
— ABP LIVE (@abplive) September 25, 2023