अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांची पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत डेव्हिड ब्लोम

इस्लामाबाद – अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत डेव्हिड ब्लोम यांनी पाकव्याप्त काश्मीरला नुकतीच भेट दिली. या भेटीत ब्लोम यांनी पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद (स्वतंत्र) काश्मीर’ म्हणून घोषित केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. ब्लोम यांच्या या भूमिकेनंतर अमेरिकेचा दुटप्पीपणा समोर आला आहे. कॅनडातील खलिस्तानवाद्यांच्या सूत्रावरून दोन्ही देशांमध्ये काही सूत्रांवरून आधीच मतभेद आहेत.


ब्लोम यांनी गेल्या वर्षीही पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली होती. या दौर्‍याला भारताने विरोध दर्शवला होता. त्यावेळीही ब्लोम यांनी पाकव्याप्त काश्मीरचा ‘आझाद (स्वतंत्र) काश्मीर’ असा उल्लेख केला होता. (जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे भारताच्या संसदेने एकमताने घोषित केले असतांना त्याविषयी विपर्यस्त विधाने करणे, हा अमेरिकेचा दुटप्पीपणा नाही, तर काय ? – संपादक)

संपादकीय भूमिका

अमेरिकेचे खरे स्वरूप ! अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते. त्यामुळे या प्रकरणात अमेरिकेला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !