पिंपरी-चिंचवड येथे बालकाचा मृत्यू !

पिंपरी-चिंचवड (पुणे) – मोशी येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन चालू असतांना अर्णव आशिष पाटील या ४ वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. मंत्रा सोसायटीमधील पाटील कुटुंब श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्या वेळी अर्णव पाण्याच्या टाकीत पडला.