ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याची मुसलमान पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली

ज्ञानवापीचे सर्वेक्षण

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून चालू असलेले वैज्ञानिक सर्वेक्षण थांबवण्याची मागणी करणारी अंजुमन इंतजामिया मशीद समितीची याचिका फेटाळून लावली. ‘हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

सर्वेक्षण करतांना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आक्षेप समितीने घेतला होता. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ ऑक्टोबरला होणार आहे.