पंतप्रधान १७ सप्टेंबरला नवीन संसदेवर राष्ट्रध्वज फडकावणार !

१७ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकावतील. या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आणि विश्‍वकर्मा जयंतीही आहे.

श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यास दक्षिण कोरिया इच्छुक !

दक्षिण कोरियासाठी अयोध्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सरकारने निमंत्रण दिल्यास दक्षिण कोरिया सोहळ्यात सहभागी होईल, असे विधान दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत चांग जे-बोक यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या संदर्भात केले.

सनातन आणि हिंदु धर्म संपवण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली आहे ! – आमदार नीतेश राणे, भाजप

सनातन धर्मावर टीका करणार्‍या ‘डी.एम्.के.’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या बैठकीत मांडण्यात आला. सनातन धर्मावर टीका करणार्‍या लोकांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव होणार असतील, तर ‘इंडिया’ आघाडी कशासाठी निर्माण झाली, हे स्पष्ट आहे.

मंत्रालयातील कामकाज ‘पेपरलेस’; मात्र सर्व विभागांमध्ये ‘फाईल्स’चे ढीग !

प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान आणि ‘पेपरलेस’ (कागदांविना) व्हावे, यासाठी १ एप्रिल २०२३ पासून मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस प्रणाली’ (संगणकीकृत कामकाज) चालू करण्यात आली आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी नौका उलटली : १८ विद्यार्थी बेपत्ता !

नौकेमध्ये किती जण बसायला हवेत ? आणि प्रत्यक्षात किती बसवले जात आहेत ?, याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही का ? आज अशी घटना घडत असेल, तर पुढेही याच कारणामुळे अशी घटना घडू शकते, असा सर्वसामान्य विचार प्रशासन करत नाही का ?

पंजाब येथील अटारी सीमेवर भारताने पाकच्या राष्ट्रध्वजाच्या खांबापेक्षा १८ फूट उंच खांब उभारला !

हा ध्वज खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बसवणार आहे. यावर फडकणारा राष्ट्रध्वज ९० किलोचा असणार आहे. ज्याची लांबी आणि रुंदी १२०x८० फूट आहे. लवकरच या ४१८ फूट उंच ध्वज खांबावर भारतीय राष्ट्रध्वज फडकतांना दिसणार !

हापुड (उत्तरप्रदेश) येथील सेंट अँथनी शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

देशभरातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती धर्मांचे संस्कार केले जातात, हे अनेक वर्षांपांसून उघड होत असतांना सरकारने आता अशा शाळांवर कठोर कारवाई करण्यासह कठोर कायदेही बनवणे आवश्यक आहेत !

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे !

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालू होते.

देहलीत मुसलमान तरुणाच्या आक्रमणात एका हिंदु तरुणाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ !

हिंदूबहुल देशाच्या राजधानीतच हिंदू असुरक्षित आहेत, तेथे अन्य ठिकाणांची काय स्थिती असेल ? , हे लक्षात येते ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उडघत नाहीत !

पाकिस्तानला वेगळे पाडण्याची आवश्यकता ! – व्ही.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदलप्रमुख

व्ही.के. सिंह जे सांगत आहेत, तेच सामान्य जनतेलाही वाटते. सरकारने हे करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !