स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनास निवेदन

राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले.

केरळमधील कासारगोड केंद्रीय विद्यापिठात ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’कडून भारतमाता आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान !

नास्तिकतावादी साम्यवाद्यांच्या या विद्यार्थी संघटनेकडून झालेल्या या अवमानावरून या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्या मागणी राष्ट्रभक्तांनी केली पाहिजे !

यात्रेच्या फलकावर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र छापल्याप्रकरणी कर्मचार्‍यावर गुन्हा नोंद !

या प्रकरणी फलक बनवणार्‍या ‘गुरुदत्त एंटरप्रायझेस’चे कर्मचारी अलंकार पाटील यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पंजाब येथील अटारी सीमेवर भारताने पाकच्या राष्ट्रध्वजाच्या खांबापेक्षा १८ फूट उंच खांब उभारला !

हा ध्वज खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बसवणार आहे. यावर फडकणारा राष्ट्रध्वज ९० किलोचा असणार आहे. ज्याची लांबी आणि रुंदी १२०x८० फूट आहे. लवकरच या ४१८ फूट उंच ध्वज खांबावर भारतीय राष्ट्रध्वज फडकतांना दिसणार !

कराड येथील युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने भव्य ‘तिरंगा रॅली’ संपन्न !

तिरंगा रॅली दत्त चौक, आझाद चौक, मेनरोड मार्गे ‘भारतमाता की जय !, वन्दे मातरम् ! या घोषणा देत मार्गस्थ होऊन येथील चावडी चौकामध्ये या रॅलीची सांगता करण्यात आली.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी ठिकठिकाणी निवेदन सादर !

विविध शाळांमध्ये समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी प्रवचन, तसेच ‘राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन’ लावण्यात आले. यास विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालय आणि प्रशासन यांनी आवश्यक ती कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदने देण्यात आली.

मिरज येथे १०० फुटी तिरंगा ध्वजाचे अनावरण !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील पहिला १०० फुटी तिरंगा ध्वज आणि तंतूवाद्य प्रतीकृती (सतार आणि तंबोरा) यांचे लोकार्पण १५ ऑगस्ट या दिवशी पार पडले.

हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या साहाय्‍याने रोखली अयोग्‍य राष्‍ट्रध्‍वजांची विक्री !

रुईकर वसाहत येथील पोस्‍ट कार्यालयात असलेल्‍या राष्‍ट्रध्‍वजांमध्‍ये असलेले अशोकचक्र हे गोल नसून अंडाकृती असल्‍याचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या लक्षात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांसह संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली

धुळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त १ सहस्र १०० मीटर राष्ट्रध्वजाच्या मिवणुकीचे आयोजन !

मिरवणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदु संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशीची मिरवणूक काढण्यात आली होती.