नवी देहली – येत्या १८ ते २२ सप्टेंबर या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनात ४ विधेयक मांडली जाणार आहेत. राज्यसभेने याविषयी माहिती दिली आहे.
(सौजन्य : ABP NEWS)
१७ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकावतील. या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आणि विश्वकर्मा जयंतीही आहे. भाजपने आपल्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना व्हीप (पक्षादेश) जारी केला आहे. जेणेकरून सर्व खासदार संसदेच्या दोन्ही सभागृहांत ५ दिवस उपस्थित रहातील.