पंजाब येथील अटारी सीमेवर भारताने पाकच्या राष्ट्रध्वजाच्या खांबापेक्षा १८ फूट उंच खांब उभारला !

अमृतसर (पंजाब) – भारताने अटारी सीमेवर बसवलेल्या राष्ट्रध्वजाच्या खांबाची उंची शेजारी देश पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाच्या खांबापेक्षा १८ फुटांनी वाढवली आहे. सध्या भारतीय तिरंग्याच्या खांबाची उंची ३६० फूट होती, तर पाकिस्तानच्या ध्वजाच्या खांबाची उंची ४०० फूट ठेवण्यात आली आहे. या ध्वजस्तंभचे उद्घाटन काही दिवसांत होणार होते; मात्र काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे; मात्र लवकरच या ४१८ फूट उंच ध्वज खांबावर भारतीय राष्ट्रध्वज फडकतांना दिसणार आहे.

४१८ फूट उंच ध्वज खांबावर भारतीय राष्ट्रध्वज फडकतांना दिसणार !

हा ध्वज खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३ कोटी ५० लाख रुपयांना बसवला आहे. यावर फडकणारा राष्ट्रध्वज ९० किलोचा असणार आहे. ज्याची लांबी आणि रुंदी १२०x८० फूट आहे.

 (सौजन्य : Janta Ki Awaz News Channel)

पाकिस्तानी ध्वजाच्या खांबावर कॅमेरे लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यावर पाकिस्तान भारतीय हद्दीत अनेक किलोमीटरपर्यंत लक्ष ठेवू शकतो.