मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थी बसल्याने झाला अपघात !
मुझफ्फरपूर (बिहार) – येथे शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली नौका येथील बागमती नदीत उलटून अपघात झाला. या नौकेमध्ये ३४ विद्यार्थी होते. यातील १८ विद्यार्थी बेपत्ता आहेत. या वेळी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणेला यायला एक घंटा विलंब झाला. (याला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करून अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजन केले पाहिजे ! – संपादक) त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला. सध्या राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथकाकडून विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. नौकेमध्ये मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसवण्यात आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकानौकेमध्ये किती जण बसायला हवेत ? आणि प्रत्यक्षात किती बसवले जात आहेत ?, याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही का ? आज अशी घटना घडत असेल, तर पुढेही याच कारणामुळे अशी घटना घडू शकते, असा सर्वसामान्य विचार प्रशासन करत नाही का ? |