पाकिस्तानला वेगळे पाडण्याची आवश्यकता ! – व्ही.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदलप्रमुख

केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदलप्रमुख व्ही.के. सिंह यांचे मत !

डावीकडे व्ही.के. सिंह

नवी देहली – काश्मीरच्या अनंतनाग येथील चकमकीत भारताचे ५ सैन्याधिकारी आणि सैनिक वीरगपतीला प्राप्त झाले आहेत. या घटनेवर माजी सैन्यदलप्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी, ‘पाकला वेगळे पाडण्याची आवश्यकता आहे. काही वेळे क्रिकेट खेळणारे पुढे येतील, काही वेळा चित्रपट निर्माते पुढे येतील; मात्र पाकला एकटे पाडणे आवश्यक आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाकशी क्रिकेट सामने खेळावेत, तसेच भारतीय चित्रपट निर्मात्यांद्वारे पाक कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये काम करू द्यावे, यांचे जे समर्थन करतात, त्यांच्यावर टीका केली
व्ही.के. सिंह पुढे म्हणाले की, पाकला जोपर्यंत आपण वेगळे पाडत नाही, तोपर्यंत ‘आतंकवादी आक्रमण करणे, ही सामान्य गोष्ट आहे’, असेच त्याला वाटत रहाणार. जोपर्यंत माझी (पाकची) स्थिती सामान्य होणार नाही, तोपर्यंत इतरांसमवेत असलेले संबंध सामान्य होणार नाहीत’, हे त्याने लक्षात घ्यायला हवे.

संपादकीय भूमिका 

व्ही.के. सिंह जे सांगत आहेत, तेच सामान्य जनतेलाही वाटते. सरकारने हे करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !