वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही पूर्वी सांगितल्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांनी त्यांच्यातील वादग्रस्त सूत्रांवर थेट चर्चा करण्याला आमचा पाठिंबा आहे, असे विधान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मॅथ्यू मिलर यांनी केले.
पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन दिवसांपूर्वीच भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरून मॅथ्यू मिलर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यापूर्वी याच वर्षी मार्चमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे तत्कालीन प्रवक्ते नेड प्राईस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले होते की, अमेरिका दोन्ही देशांना चर्चेसाठी सिद्ध करण्यास तयार आहे; मात्र त्यापूर्वी त्यांनीच यासाठी सिद्ध झाले पाहिजे. आम्ही मध्यस्थी करण्यास सिद्ध आहोत.
संपादकीय भूमिका
|