चेन्नई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या (हिंदू आघाडीवर) मुख्य कार्यकर्त्यांसाठी ब्रोडव्हे, चेन्नई येथील त्यांच्या कार्यालयात ३० जुलै २०२३ या दिवशी ‘साधना’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश, सुख आणि आनंद यांतील भेद, दु:खाची कारणे, साधनेचे विविध मार्ग, कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व, आचारधर्म इत्यादी विषयांवर पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांनी उत्सुकतेने विषय समजून घेतला आणि शंकानिरसन करून घेत प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्धार केला. तसेच स्वतःला समजलेली साधना इतरांनाही सांगणार असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.