प्रदीप कुरुलकर यांच्‍यावर देशद्रोहाचा खटला चालवावा ! – जयंत पाटील, प्रदेशाध्‍यक्ष

जयंत पाटील, प्रदेशाध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

मुंबई, ३ ऑगस्‍ट (वार्ता.) – काही दिवसांपूर्वी पुणे येथे ‘डी.आर्.डी.ओ.’चे उच्‍च पदस्‍थ अधिकारी प्रदीप कुरुलकर यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली; मात्र त्‍यांच्‍यावर ‘ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्‍ट’ अंतर्गत खटला चालू आहे; मात्र हा खटला देशद्रोहाच्‍या गुन्‍ह्यांतर्गत का चालवला गेला नाही ?, असा प्रश्‍न राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील यांनी ३ ऑगस्‍टला विधानसभेत उपस्‍थित केला.

प्रदीप कुरुलकर यांच्‍यावर ‘हनीट्रॅप’मध्‍ये अडकून एका पाकिस्‍तानी महिलेला देशाच्‍या संरक्षण क्षेत्रातील गुप्‍त माहिती पुरवल्‍याचा आरोप आहे. यावर जयंत पाटील म्‍हणाले की, या अधिकार्‍यावर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा. हा खटला का चालवला नाही ? याची पडताळणी करा.