नेदरलँड्स सरकार पुढील वर्षीपासून शाळांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालणार !

सरकारचे म्हणणे आहे की, यंत्रांचा शिक्षणावर परिणाम होत आहे. विद्यार्थी शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

उत्तराखंडमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु कुटुंबियांवर आक्रमण

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

आवश्यकता भासल्यास अबकारी घोटाळ्याचे अन्वेषण दक्षात खात्याकडे सोपवणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

या घोटाळ्याची खात्याअंतर्गत चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

वारजे (पुणे) पोलीस ठाण्यातील ३ निरीक्षकांसह ४ कर्मचारी निलंबित !

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वारजे पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (सध्या नेमणूक सायबर पोलीस ठाणे) डी.एस्.हाके, तत्कालीन पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, यांच्यासह अन्य ४ जणांचा समावेश आहे.

गोराई (मुंबई) येथे १०० वर्षे जुने आणि जागृत श्री वांगणादेवीचे मंदिर पाडले !

पॅगोडा ज्या ठिकाणी आहे, ती भूमी मूळ मालकाने दुसर्‍याला दान केली आहे. त्यामुळे नव्या मालकाने गावकर्‍यांच्या धार्मिक भावना लक्षात न घेता मंदिरावर जेसीबी चालवला. 

पंढरीच्या वाटेवर दिंड्यांना शिधा पुरवणारा मिलिंद चवंडके हा मुलुखावेगळा प्रवचनकार ! – ह.भ.प. सतीश महाराज निमसे

आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या दिंड्यांना अनेकजण अन्नदान करतात; पण दिंड्यांमागे थेट टेंभूर्णीपर्यंत येऊन किराणा साहित्यासह उपवासासाठी फराळाचे विविध प्रकार अगदी दूधही पुरवून वारकर्‍यांशी समरस होणारे मिलिंद चवंडके हे महाराष्ट्र राज्यातील मुलूखावेगळे प्रवचनकार आहेत, असे कौतुकोद्गार ह.भ.प. सतीश महाराज निमसे यांनी काढले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नृसिंह याग पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, या उद्देशांसाठी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ जुलै या दिवशी नृसिंह याग करण्यात आला.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव २ आणि ३ जुलै या दिवशी येथील भक्तवात्सल्याश्रमाच्या जवळ असलेल्या नवनीत गार्डन येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये साकारणार शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळीचे देखावे !

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यशासनाकडून स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठीचे निकष आणि गुणांची वर्गवारी घोषित केली आहे. यामध्ये शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळ यांविषयीचे देखावे निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी सर्वांधिक गुण ठेवले आहेत.