पॅगोडाच्या विश्वस्तांचा प्रकार !
मंदिर पुन्हा बांधून न दिल्यास आंदोलनाची चेतावणी
गोराई (मुंबई) – येथील जागतिक विपश्यना पॅगोडा परिसरात असलेल्या १०० वर्षे जुन्या आणि जागृत श्री वांगणादेवीच्या मंदिरावर पॅगोडाच्या विश्वस्तांनी कारवाई करून मंदिर पाडले, तसेच तेथील नव्या बांधकामाला आडकाठी न येता लवकर मान्यता मिळावी, यासाठी महापालिकेला सादर केलेल्या नव्या आखाड्यात मंदिराची माहिती लपवण्यात आली आहे. परिसरातील लोक नियमितपणे देवीची पूजाअर्चा करत होते. विश्वस्तांनी मंदिरासमवेत भलामोठा पवित्र पिंपळ वृक्षही तोडला. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी विश्वस्तांच्या विरोधात गोराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ‘तोडलेले मंदिर पुन्हा बांधून द्या, अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र करू’, अशी चेतावणी भाविकांनी केली आहे.
पॅगोडा ज्या ठिकाणी आहे, ती भूमी मूळ मालकाने दुसर्याला दान केली आहे. त्यामुळे नव्या मालकाने गावकर्यांच्या धार्मिक भावना लक्षात न घेता मंदिरावर जेसीबी चालवला.