नेदरलँड्स सरकार पुढील वर्षीपासून शाळांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालणार !

अ‍ॅम्स्टरडॅम (नेदरलँड्स) – नेदरलँड्स सरकारने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भ्रमणभाष संच, स्मार्टवॉच (आधुनिक घड्याळ) आणि टॅब्लेट (लहान भ्रमणसंगणक) यांचा वापर करण्यावर पुढील वर्षीपासून बंदी घालणार आहे. सरकारने या संदर्भात पालक आणि शिक्षक यांची संमती घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत समयमर्यादा घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, यंत्रांचा शिक्षणावर परिणाम होत आहे. विद्यार्थी शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

यापूर्वी फ्रान्स सरकारने वर्ष २०१८ मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये भ्रमणभाष संच वापरण्यावर बंदी घातली होती. ब्रिटनमधील बहुतांश शाळांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर आधीपासूनच बंदी आहे.