नवीन संसद भवनाच्या उद़्घाटनासाठी तमिळनाडूहून आलेल्या विविध अधीनम्च्या (मठाच्या) स्वामींचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास शुभाशीर्वाद !
संसद भवनाच्या उद़्घाटन सोहळ्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प्रमुख मठाधिपतींचा त्यांच्या निवासाच्या ठिकाणी जाऊन शाल आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
हिंदु संघटनांकडून ७ जूनला ‘कोल्हापूर बंद’ची हाक !
कोल्हापूरप्रमाणे सर्वत्रचे हिंदू जागरूक झाल्यास धर्मांधांच्या उद्दाम कृत्यांना आळा बसण्यास वेळ लागणार नाही !
राज्यातील क्रीडा शिक्षकांना जर्मनीतील प्रशिक्षक फूटबॉलचे प्रशिक्षण देणार ! – रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्ट्र
महाराष्ट्रात फूटबॉल या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनीमधील ‘फूटबॉल क्लब बायर्न’ या जगप्रसिद्ध संस्थेसमवेत सहकार्य करार केला आहे.
आयोगाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवावे ! – प्रकाश आंबेडकर
कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे वर्ष २०१८ मध्ये दंगल झाली होती. सध्या या प्रकरणी आयोगासमोर चौकशी चालू आहे. आता आंबेडकर यांना आयोगाने चौकशीसाठी बोलावले आहे.
राष्ट्रवाद रुजवणे अत्यावश्यक !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही राज्यांमधील सीमावादाचा प्रश्न सुटू न शकणे, हे लोकशाहीचे ठळक अपयश नाही का ?
विदेशी नको देशी झाडेच लावा !
देशी झाडांच्या लागवडीविषयी माहिती घेऊन प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन देशी अशा झाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे आणि पर्यावरण वाचवण्यात हातभार लावला पाहिजे ! तसेच सरकारच्या संबंधित विभागांना विदेशी झाडे लावण्यापासून परावृत्त करूया !
छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित कार्य करून त्यांचे मावळे होऊया ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती
व्याख्यानातून श्री. पुजारे यांनी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग श्रोत्यांसमोर मांडले. तसेच ‘सध्या समाजातील विविध जिहादी समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण प्रत्येकालाच कसे आवश्यक आहे ?’, हे सध्याच्या लव्ह जिहाद आणि हिंदूंच्या हत्यांच्या उदाहरणांसहित सांगितले.
या स्थितीला उत्तरदायी कोण ?
उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे एका मुसलमान दुकानदाराने एका अल्पवयीन हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या घटनेमुळे ‘मुसलमान दुकानदारांनी १५ जूनपर्यंत त्यांची दुकाने रिकामी करून निघून जावे’ अशी चेतावणी देणारी भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत.
सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांची परिस्थिती गंभीर !
सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असून त्याला उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सादर केले.