कोल्हापूर – धर्मांधांकडून मुसलमान आक्रमकांचे उदात्तीकरण केले जात असल्याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ७ जून या दिवशी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली आहे.
दिवसभरातील अन्य घडामोडी
१. दुपारी काही हिंदुत्वनिष्ठ तरुणांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जाऊन धर्मांधांवर कारवाई करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी ‘संबंधिताचा भ्रमणभाष पडताळला पाहिजे’ यांसह अन्य कारणे देत प्रारंभी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला.
२. धर्मांधांकडून ‘स्टेट्स’ ठेवल्याचे आणि तरीही पोलिसांकडून काहीच कारवाई होत नसल्याचे वृत्त शहरात वेगाने पसरले. यानंतर मोठ्या संख्येने जमाव एकत्र आला आणि संतप्त झालेल्या जमावाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गल्ल्यांमध्ये काही दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
३. या वेळी हिंदु समाज मोठ्या संख्येने एकत्र आला होता. या प्रसंगी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेल्या हिंदु युवकांना पोलिसांनी हुसकावून लावले.
दोन धर्मांध कह्यात ?
या प्रकरणी पोलिसांनी सायंकाळी दोघा धर्मांधांना कह्यात घेतल्याचे समजते. सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाकोल्हापूरप्रमाणे सर्वत्रचे हिंदू जागरूक झाल्यास धर्मांधांच्या उद्दाम कृत्यांना आळा बसण्यास वेळ लागणार नाही ! |