‘द केरल स्टोरी’ चित्रपट विकत घेण्यास एकही ओटीटी मंच सिद्ध नाही !

यामागे षड्यंत्र असल्याचा दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा आरोप

(म्हणे) ‘गोरक्षकांना लाथ मारून कारागृहात टाका !’ – प्रियांक खर्गे, कर्नाटक

यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे उघड होते. हिंदु संघटित नसल्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे हिंदूंचा सातत्याने उपहास करण्याचे धारिष्ट्य होते ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अणूबाँब डागण्याच्या तोफा तैनात !

‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम उपाय आहे’, हे लक्षात घेऊन भारताने पाकला लक्षात राहील, असे आक्रमण त्याच्यावर करणे आवश्यक आहे !

कायदेमंडळाने सामाजिक पालटानुसार ‘पॉक्सो’सारख्या कायद्यांत पालट करावेत ! – मेघालय उच्च न्यायालय

किशोरवयीन (अनुमाने १६ वर्षे वयाच्या) मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पहाता ही मुले लैंगिक संबंध ठेवण्याआधी स्वतःच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्यास सक्षम आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्कार प्रदान !

राष्ट्र आणि भारतीय संस्कृती यांकडे वक्रदृष्टीने पहाणार्‍यांच्या विरोधात सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करणे, हिंदुद्वेषी चित्रकार एम् एफ्  हुसेन आणि डॉ. झाकीर नाईक यांचे राष्ट्र तथा समाज विरोधी स्वरूप लोकांसमोर आणणे, तसेच भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ पुस्तकांचे लेखन करणे, यांसाठी श्री. रमेश शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकच हा भाग भारतात विलीन करण्याची मागणी करतील ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. येथील जनताही भारतात येऊ इच्छित आहे. भारताच्या संसदेने पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन मागे !

याविषयी कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात चालू राहील’, असे तिने म्हटले आहे.

इस्लाम विवाहपूर्वी शारीरिक संबंधांना अनुमती देत नाही !

‘लिव इन रिलेशनशीप’ला पाठिंबा देऊन हिंदु धर्मावर टीका करणार्‍या पुरोगाम्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

अकोला येथील श्री राजराजेश्‍वर आणि श्री विठ्ठल मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

महाराष्ट्रातील सर्वत्रच्या मंदिर विश्‍वस्तांनी याचा आदर्श घ्यावा !