काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र तथा कर्नाटकमधील मंत्री प्रियांक खर्गे यांचा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना आदेश !
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘कायदा हातात घेणार्या गोरक्षकांना लाथ मारून कारागृहात टाका’, असा आदेश काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र तथा कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना दिला.
सौजन्य सोसाऊथ
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांक खर्गे यांनी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात पोलीस अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बजरंग दलाचे नाव न घेता वरील विधान केले. ‘एखादा स्वयंघोषित नेता जातीय प्रश्नांच्या नावाखाली विष कालवत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे’, असेही ते या वेळी म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्यांचा हिंदुद्वेष जाणा !१. ४ जून २०२३ या दिवशी कर्नाटक सरकारचे पशूसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी ‘रेडा आणि म्हशी कापल्या जाऊ शकतात, तर गाय का नाही ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. २. ७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी ‘हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ फारच घाणेरडा आहे’, असे संतापजनक विधान केले होते. |
संपादकीय भूमिका
|