इस्लाम विवाहपूर्वी शारीरिक संबंधांना अनुमती देत नाही !

‘लिव इन रिलेशनशीप’ संदर्भातील याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयच्या लखनौ खंडपिठाचे मत !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने काही दिवसांपूर्वी ‘लिव इन रिलेशनशीप’च्या संदर्भातील एका याचिकावर सुनावणी करतांना संबंधित मुसलमान तरुण आणि तरुणी यांना साहाय्य करण्यास इस्लामच्या नियमांच्या आधारे नकार दिला होता. न्यायालयाने म्हटले होते की, इस्लाममध्ये विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवण्यास अनुमती दिली जात नाही. विवाहापूर्वी प्रेम व्यक्त करण्याच्या कोणत्याही कृतीला म्हणजे स्पर्श, चुंबन आदींना अनुमनी दिली जात नाही.

या तरुण आणि तरुणी यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा दावा करत यावर साहाय्य करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. न्यायालयाच्या वरील आदेशानंतर आता वाद चालू झाला आहे.

संपादकीय भूमिका 

‘लिव इन रिलेशनशीप’ला पाठिंबा देऊन हिंदु धर्मावर टीका करणार्‍या पुरोगाम्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?