जम्मू – पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. येथील जनताही भारतात येऊ इच्छित आहे. भारताच्या संसदेने पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. तेथे पाक सरकारकडून जे काही अत्याचार केले जात आहेत ते पहाता भविष्यात तेथील नागरिकांकडून ‘आम्हाला भारतात यायचे आहे’, अशी मागणी केली जाईल, असे विधान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथील जम्मू विश्वविद्यालयाात केले. ते येथे संरक्षणविषयक परिषदेत बोलत होते.
Defence Minister #RajnathSingh was addressing a “security conclave” organized at Jammu University on internal and external dimensions of the country’s defence mechanism. https://t.co/3RE1SJfRxI
— Hindustan Times (@htTweets) June 26, 2023
व्यवस्था पालटल्यावर भ्रष्टाचार नष्ट होईल !
राजनाथ सिंह म्हणाले की, मी हा दावा करत नाही की, आम्ही भ्रष्टाचाराला मुळासकट नष्ट केले आहे. हे कुणीही करू शकत नाही. केवळ भाषण देऊन भ्रष्टाचार नष्ट केला जाऊ शकत नाही. त्यासाठी व्यवस्थेमध्ये पालट करून तो अल्प करता येऊ शकतो. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रक्रिया प्रारंभ केली आहे.