नवी देहली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी या कुस्तीपटूंकडून आंदोलनही चालू होते. आता सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) June 25, 2023
याविषयी कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात चालू राहील’, असे तिने म्हटले आहे.