(म्हणे) ‘केरळमधील ३२ सहस्र महिलांनी इस्लाम स्वीकारल्याचा पुरावा द्या आणि १ कोटी रुपये मिळवा !’ – काँग्रेसचे नेते शशी थरूर

काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्‍या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?

शरद पवार यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाचे एकाएकी त्यागपत्र !

उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांनी पदाचे त्यागपत्र मागे  घेण्याची गळ घातली , अजित पवार यांनी मात्र भावनात्मक न होता शरद पवार यांच्या त्यागपत्राच्या भूमिकेचे समर्थन केले.

राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेले ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ ला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहे, कारण या लोकांचा राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेला आहे.

गोवा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुविधांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !

बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतांना त्यांच्या कल्याणासाठी देण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून ! ही माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दिली !

गोवा : बेतोडा येथे चारचाकी, तर कुंडई येथे कंटेनर उलटून भीषण अपघात

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र चालूच आहे. कुंडई येथे याच ठिकाणी वर्षभरात १०० अपघात घडतात; पण ते रोखण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.

आता ‘पी.एम्.पी.’ घडवेल पुणे येथील धार्मिक स्‍थळांची यात्रा !

प्रवाशांना आता ‘पी.एम्.पी.’द्वारे धार्मिक आणि पर्यटनस्‍थळांची यात्रा (सहल) घडणार आहे. प्रतिसप्‍ताहाच्‍या शनिवार आणि रविवार, तसेच शासकीय सुट्ट्यांच्‍या दिवशी या सहलींचे आयोजन करण्‍यात आले आहे.

नाशिक महापालिका आयुक्त मारहाण प्रकरण आमदार बच्चू कडू यांच्या शिक्षेला स्थगिती !

जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणि अधिकार्‍यांसमवेत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ५ सहस्र रुपयांचा दंड आणि १ वर्षांची शिक्षा सुनावली होती; मात्र या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

यासाठी तरी देवाचे भक्त व्हा !

‘तिसर्‍या महायुद्धातील भीषण काळात केवळ देवच वाचवू शकेल; म्हणून तरी देवाचे भक्त व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नगर जिल्‍ह्यात सातवाहन ते मध्‍ययुगीन वसाहतींचे पुरावे उत्‍खननात सापडले !

उत्‍खननाचे हे कार्य मे मासाच्‍या दुसर्‍या आठवड्यापर्यंत चालणार आहे. उत्‍खननात सातवाहन काळातील बाजारपेठ आणि त्‍या गावात रहाणार्‍या लोकांचे रहाणीमान दर्शवणारे पुरावे सापडत आहेत.