हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात संपूर्ण देशभर जनजागृती मोहीम राबवू ! – गुप्तेश्वर पांडे, माजी पोलीस महासंचालक, बिहार

बिहार राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि सुप्रसिद्ध कथाकार श्री. गुप्तेश्वर पांडे यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.

सातारा येथे ८ वीतील मुलीची विक्री करून तिच्यावर बलात्कार !

यातून समाजाची नैतिकता किती खालावली आहे, तसेच गुन्हा करण्याची गुन्हेगारांना कुठलीच भीती वाटत नाही, हे लक्षात येते. अशा राज्यात मुली-महिला कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ?

आजचा वाढदिवस

वैशाख कृष्‍ण तृतीया (८.५.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. अरविंद कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) यांचा ८३ वा वाढदिवस आहे. त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत. श्री. अरविंद कुलकर्णी यांना ८३ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने नमस्‍कार !

तमिळनाडूतील हिंदुद्वेषी दडपशाही जाणा !

तमिळनाडू मल्‍टिप्‍लेक्‍स असोसिएशनने ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्‍यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्‍यवस्‍थेला धोका ठरू शकतो’, असे या संघटनेने याविषयी म्‍हटले आहे.

भारतविरोधी धोरण चालवणार्‍या विदेशी शक्तींना अर्थमंत्री सीतारामन् यांचे सडेतोड प्रत्युत्तर !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विदेशात खोट्या बातम्यांच्या आधारावर भारतविरोधी धोरण (अजेंडा) चालवणार्‍या शक्तींना ते जेथून हे धोरण चालवत आहेत, तेथे जाऊन सडेतोड उत्तर देत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी त्यांच्या अमेरिका दौर्‍यात…

प्रयत्नांमध्ये खंड पडणे स्वाभाविक असल्याने त्याविषयी वाईट वाटून न घेता पुन्हा प्रयत्न चालू करावेत !

काही जण प्रयत्नांमध्ये खंड पडल्यावर ‘मला हे जमणारच नाही’, असा विचार करून प्रयत्न करायचेच सोडून देतात. असे न करता जेव्हा प्रयत्नांमध्ये खंड पडेल, तेव्हा पुन्हा नव्याने प्रयत्न चालू करावेत.

गीर जातीच्या गायीच्या गोमूत्रामध्ये सोने सापडणे

‘गुजरातच्या जुनागड कृषी विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी गुजरातमध्ये आढळणार्‍या प्रसिद्ध गीर जातीच्या गायीच्या मूत्रातून सोने मिळत असल्याचा दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांनी राष्ट्रहित जपावे !   

जसाजसा काळ पुढे चालला आहे, तसा या वाहिन्यांमधील परिपक्वपणा, समंजसपणा वाढण्याच्या ऐवजी बालिशपणा, बाजारू वृत्ती, उथळ बातम्या देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अंतर्मुख होऊन कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे ? याचा विचार करावा !

धर्म हा आरक्षणाचा आधार नाही !

मुळातच आरक्षण देणे म्हणजे पात्र असलेल्या व्यक्तींना नाकारणे होय ! खरेतर राज्यघटना कार्यवाहीत आली, त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘आरक्षण हे केवळ पुढील १० वर्षे असेल’, असे सांगितले होते; परंतु ते रहित न होता आज त्याचा लाभ राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. त्यामुळे आरक्षण रहित करून आर्थिक निकषांवर ते द्यायला हवे.

मणीपूर हिंसाचार : ख्रिस्त्यांच्या आक्रमकतेचा परिणाम !

मणीपूर येथील हिंदु मैतींविरुद्ध ख्रिस्ती कुकी अन् नागा यांचा संघर्ष हा ख्रिस्त्यांच्या धर्मांधतेचाच परिणाम !