प्रयत्नांमध्ये खंड पडणे स्वाभाविक असल्याने त्याविषयी वाईट वाटून न घेता पुन्हा प्रयत्न चालू करावेत !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १९१

वैद्य मेघराज पराडकर

‘सकाळी सूर्याेदयापूर्वी उठणे, नियमित व्यायाम करणे, भूक नसतांना खाणे टाळणे, दिवसा न झोपणे यांसारख्या आरोग्यदायी सवयी अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करत असतांना ‘त्यांमध्ये खंड पडणे’, हे स्वाभाविक आहे. काहींना प्रयत्नांमध्ये खंड पडल्यावर वाईट वाटते. काही जण प्रयत्नांमध्ये खंड पडल्यावर ‘मला हे जमणारच नाही’, असा विचार करून प्रयत्न करायचेच सोडून देतात. असे न करता जेव्हा प्रयत्नांमध्ये खंड पडेल, तेव्हा पुन्हा नव्याने प्रयत्न चालू करावेत. प्रयत्नांची गोडी लागली आणि आरोग्य मिळू लागले की, हळूहळू प्रयत्नांमध्ये सातत्य येऊ लागते. नंतर खंड पडायचेही न्यून होते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan