गीर जातीच्या गायीच्या गोमूत्रामध्ये सोने सापडणे

‘गुजरातच्या जुनागड कृषी विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी गुजरातमध्ये आढळणार्‍या प्रसिद्ध गीर जातीच्या गायीच्या मूत्रातून सोने मिळत असल्याचा दावा केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार विश्वविद्यालयाच्या ‘बायोटेक्नोलॉजी’ विभागाचे अध्यक्ष डॉ. गोलकिया यांनी ४ वर्षांच्या संशोधनाच्या काळात गीर जातीच्या ४०० पेक्षा अधिक गायींच्या मूत्राची सतत चाचणी केल्यानंतर त्यांनी एक लिटर गोमूत्रामध्ये ३ ते १० मिलीग्रॅमपर्यंत सोने निघत असल्याचा दावा केला आहे.

गीर गाय

१. प्राचीन ग्रंथांमध्ये गोमूत्रामध्ये सोने सापडण्याचा उल्लेख

गोमूत्राच्या परीक्षणासाठी डॉ. गोलकिया आणि त्यांच्या गटाने ‘क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री’ पद्धतीचा वापर केला होता. डॉ. गोलकिया यांनी म्हटले, ‘‘आतापर्यंत आपण प्राचीन ग्रंथांमध्येच गोमूत्रामध्ये सोने सापडते, अशा गोष्टी ऐकत होतो; परंतु  त्याला वैज्ञानिक पुरावा नव्हता. आम्ही यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही गीर जातीच्या ४०० गायींच्या मूत्राचे परीक्षण केले आणि त्यातून सोने शोधून काढले.’’

२. गोमूत्रातून निघणार्‍या सोन्याचे मूल्य

त्यांनी म्हटले, ‘‘गोमूत्रातून सोने केवळ रासायनिक प्रक्रियेद्वारेच काढले जाऊ शकते. ज्यामध्ये एका निरोगी गायीच्या मूत्रातून एक दिवसात न्यूनतम ३ सहस्र रुपये (आताचे ६ सहस्र १०० रुपये) मूल्याचे एक ग्रॅम सोने, म्हणजे एका मासात जवळजवळ १ लाख रुपये मूल्याचे (आताचे २ लाखांहून अधिक मूल्याचे) सोने काढले जाऊ शकते.’’

३. गोमूत्रामध्ये ३८८ असे औषधी गुण

डॉ. गोलकिया यांनी म्हटले आहे, ‘‘संशोधनाच्या काळात आम्ही गायी व्यतिरिक्त म्हैस, उंट, बोकड यांच्या मूत्राचेही परीक्षण केले; परंतु कुणाच्याही मूत्रामध्ये सोने सापडले नाही. या व्यतिरिक्त संशोधनात हेसुद्धा सापडले की, गोमूत्रामध्ये ३८८ असे औषधी गुण असतात, ज्यामुळे कितीतरी आजार बरे केले जाऊ शकतात. गीर जातीच्या गायींच्या मूत्रामध्ये ५ सहस्र १०० घटक सापडतात, ज्यांपैकी ३८८ घटकांमध्ये कितीतरी आजार दूर करण्याची वा उपचार करण्याची क्षमता आहे.’’ डॉ. गोलकिया यांचा गट आता भारतात आढळणार्‍या अन्य देशी गायींच्या गोमूत्रांवर संशोधन करणार आहे.’

(साभार : मासिक ‘गोसंपदा’ आणि मासिक ‘कल्याण’)