श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरण संवेदनशील ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाबहाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरणाला राष्ट्रीय महत्त्व आहे आणि ते संवेदनशील आहे. याचा संपूर्ण देशावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणेच योग्य होणार आहे, असे अलाबहाद उच्च न्यायालयाने म्हटले. या प्रकरणाच्या सर्व याचिका उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात यावी, अशी याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने वरील मत मांडले. आता न्यायालयाने मुख्य न्यायाधिशांकडे हे प्रकरण सोपवले आहे.