मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक बंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

अलिबाग – मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद असेल; मात्र मांडवा ते भाऊचा धक्का अशी चालणारी रो रो सेवा चालू रहाणार आहे. गेटवे ते मांडवा हा जलप्रवास मुंबईहून अलिबागला येण्यासाठी जलद आणि सोयीचा आहे. त्यामुळे वेळ, पैसा यांची बचत होते. जूनपासून पावसाळा चालू होत असल्याने बोटी बंद केल्या जातात. या वेळी २६ मेपासून जलप्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.