मेरठ पालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ गाण्यास मुसलमान सदस्यांचा विरोध

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

एम्.आय.एम्. आणि भाजप यांच्या सदस्यांमध्ये हाणामारी !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील पालिका आणि नगर पंचायत यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहणाच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ गाण्यास आणि त्या वेळी उभे रहाण्यास एम्.आय.एम्.च्या सदस्यांनी विरोध केला. त्या वेळी भाजपच्या सदस्यांकडून त्यांना विरोध करण्यात आल्यावर दोघांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना सभागृहातून बाहेर काढले. येथील चौधरी चरणसिंह विश्‍वविद्यालयमधील नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शपथग्रहणाच्या वेळी आयुक्त जे. सेल्वा कुमारी महापौर आणि नगरसेवक यांना शपथ देणार होत्या. त्या वेळी एम्.आय.एम्.च्या सदस्यांनी ‘आम्ही भारत झिंदाबाद बोलू; मात्र वन्दे मातरम् म्हणणार नाही. हा भाजपचा कार्यक्रम नाही. हा पालिकेचा कार्यक्रम आहे’, असे म्हटले. त्यानंतर वाद चालू झाला.

संपादकीय भूमिका

  • केंद्र सरकारने आता ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीतासमान दर्जा देऊन ते म्हणणे अनिवार्य करण्याचा नियम करावा आणि न म्हणणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कारागृहात टाकण्याच्या शिक्षेची तरतूद करावी, असेच देशभक्तांना वाटते !
[WPI_DISPLAY_SHARE_ICONS][RELATED_ARTICLES]