(म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी व्यासपिठावरून ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा द्यावी !’ – आमदार इरफान अन्सारी

‘मी ‘जय बजरंगबली’च्या घोषणा देत असतो’, असाही अन्सारी यांचा दावा !

विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक ‘जनी जनार्दन ’: डॉ. तात्यासाहेब नातू यांचे जीवन चरित्र

एखादा ‘आमदार’ हा ‘देवमाणूस’ असू शकतो, हे सांगून कदाचित् आजच्या पिढीला खरे वाटणार नाही; पण हे सत्य सांगणारे हे चरित्र आहे. तरुण वर्गाला आयुष्यभर पुरेल, इतकी संस्काराची शिदोरी या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध होणार आहे.

शरीयत कायद्यातील एकतर्फी तलाकची प्रक्रिया रहित करा ! – क्रिकेटपटू महंमद शमी यांची पत्नी

समलैंगिक विवाहांपेक्षा ‘तलाक’ देण्याच्या कुप्रथेच्या माध्यमातून मुसलमान महिलांवरील होत असलेला अन्याय हा पुष्कळ गंभीर विषय असून न्यायालयाने हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा, असेच संवेदनशील जनतेला वाटते !

आषाढी एकादशीनिमित्त ५ सहस्र विशेष बस सोडणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आषाढी एकादशीच्या निमित्ताने एस्.टी. महामंडळाच्या वतीने ५ सहस्र विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या २५ जून ते ५ जुलै या कालावधीत धावणार आहेत.

बिहारमध्ये मुसलमान तरुणीसोबत जाणार्‍या हिंदु तरुणाला मुसलमानांकडून बेदम मारहाण !

नेहमी हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे अशा घटनांनंतर मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

राजकीय नेते पैसे देऊन सभांसाठी गर्दी जमावतात ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

राजकीय पक्ष आणि संत यांच्यात हाच भेद आहे ! बहुतांश राजकीय पक्ष जनतेला पैसे, सुविधा आदींचे गाजर दाखवतात, तर हिंदूंचे साधू-संत जनतेला  शाश्‍वत आनंदाच्या अनुभूतीकडे मार्गक्रमण करण्यासाठी साधना सांगतात, हे जाणा !

पैसे गुंतवता किवा न गुंतवता ऑनलाईन ‘रमी’ खेळणे जुगार नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

ऑनलाईन खेळाच्या संदर्भात ‘गेम्सक्राफ्ट’ हे आस्थापन ‘गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इंजेलिजन्स डायरक्टरेट जनरल’ने जारी केलेल्या २१ सहस्र कोटी रुपयांच्या कराराच्या संदर्भातील नोटिशीवर न्यायालयाने वरील मत मांडले.

(म्हणे) ‘आम्हाला गाभार्‍यात जायचे नव्हते, तर त्र्यंबकेश्‍वराला केवळ धूप दाखवायचा होता !’ – उरूसाच्या आयोजकांचे स्पष्टीकरण

इस्लाममध्ये ऊरूस साजरा केला जातो, तर हिंदु धर्मात धार्मिकस्थळी जत्रा भरवली जाते. ऊरूस अन् त्र्यंबेकश्‍वर मंदिर यांचा काय संबंध ? मुसलमानांनी मंदिरात प्रवेश करण्याचा आग्रह धरणे, हे कोणत्या तत्त्वात बसते ?

(म्हणे) ‘प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटगृह मालकांनी चित्रपट हटवला !’ – तमिळनाडूतील द्रमुक सरकार

सरकारने म्हटले की, हा चित्रपट १९ मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटावर बंदी आणली असल्याचा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांनी सादर केलेला नाही.

चीनमध्ये अमेरिकेच्या नागरिकाला हेरगिरीच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

चीनने अमेरिकेच्या ७८ वर्षीय नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अमेरिका आणि हाँगकाँग यांचे नागरिकत्व असलेेले जॉन शिंग-वान लेयुंग यांना चीनच्या सुझोऊ शहरातून १५ एप्रिल २०२१ या दिवशी अटक करण्यात आली होती.